8 June 2019

अ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाची पत्नी दान करणार अर्धी संपत्ती

अ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाची पत्नी दान करणार अर्धी संपत्ती



 अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पत्नी सेवाभावी संस्थेला दान करणार अठराशे कोटी डॉलर

 निर्णय का घेतला? : 
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस व पत्नी मॅककेन्झी यांचा घटस्फोट होणार आहे.
यानंतर त्यांना पतीकडून मोठी रक्कम मिळणार आहे.
यातील निम्मी रक्कम म्हणजे 1 लाख 26 हजार कोटींचे दान करण्याचा निर्णय मॅककेन्झी यांनी जाहीर केला आहे.

 सेवाभावी संस्थेला दान करणार : 
2010 मध्ये वॉरेन बफेट यांनी ‘गिव्हींग प्लेज’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. चीन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडच्या देशातील अब्जाधीशांह बिल गेट्स यांनी या संस्थेला दान दिले आहे.

मॅककेन्झी यांनी या संस्थेला दान करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : 
जेफ बेझोस हे ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. जेफ यांची नेटवर्थ 137 अब्ज डॉलर असल्याची नोंद आहे.

 सामाजिक कार्याला दान केल्यानंतर जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या यादीत मॅककेन्झी यांचा समावेश होणार आहे.

.

No comments:

Post a Comment