ऑटोमोबाईल
कुठं काय?
1) बलेनोचे
हायब्रिड मॉडेल लॉन्च : मारुती सुझुकी कंपनीने 1.2 ड्युअल जेट आणि बीएस स्टेज 6 इंजिन
असलेली नवीन हायब्रीड बलेनो बाजारात उतरवली आहे.
नव्या मॉडेलनंतर
बलेनोचे नेहमीचे 1.2 लीटर आणि हायब्रीड असे दोन प्रकार उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना
यासाठी 5.58 लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. इंजिनच्या नव्या अत्याधुनिक तंत्रामुळे
पेट्रोलची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
2)
Ducati ची Scrambler लाँच : इटलीची कंपनी डुकाटीने स्क्रॅम्बलर मोटरसायकलची नवी आवृत्ती
बाजारात आणली आहे. स्क्रॅम्बलरच्या मालिकेत आयकॉन, फुल थ्रोटल, कॅफे रेसर आणि डेझर्ट
स्लेड यांसारखे मॉडल्स आहेत.
कंपनीच्या
जाहिरातीनुसार नव्या आयकॉनची किंमत 7.89 लाख रुपये, फुल थ्रोटलची किंमत 8.92 लाख रुपये,
कॅफे रेसरची किंमत 9.78 लाख रुपये आणि डेझर्ट स्लेडची किंमत 9.93 लाख रुपये आहे. कंपनीच्या
देशातील सर्व 9 डिलरशिपमध्ये बाईकसाठी बुकिंग सुरू झाली आहे.
3) अल्टो
800 ची नवीन आवृत्ती : मारूती सुझुकी कंपनीने अल्टो 800 या लोकप्रिय मॉडेलची नवीन आवृत्ती
विविध व्हेरियंटच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.
🎯
नवीन फिचर्स:
▪ यात प्रामुख्याने डिझाईन, अंतर्गत
भाग आणि सुरक्षाविषयक फिचर्समध्ये बदल करण्यात आलेला आहे.
▪ आता ड्रायव्हरच्या बाजूने सुरक्षेसाठी
एयर बॅगची सुविधा देण्यात आलेली आहे.
▪ ईबीडी प्रणालीसह एबीएस सिस्टीम प्रदान
केलेली आहे.
▪ रिअर पार्कींग सेन्सर, सिटबेल्ट रिमाइंडर
आणि स्पीड अलर्ट सिस्टीमचाही अंतर्भाव केलेला आहे.
▪ कारची डिझाईनदेखील थोड्या प्रमाणात
बदलण्यात आलेली आहे.
▪ या मॉडेलमध्ये 796 सीसी क्षमतेचे,
थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन प्रदान करण्यात आले आहे.
▪ हे इंजिन बीएस-6 या मानकानुसार विकसित
करण्यात आले असून याला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समीशन प्रणालीशी संलग्न करण्यात आले
आहे. यात सीएनजीचा पर्याय दिलेला नाही.
💰
विविध व्हेरियंटचे मूल्य : मारूती सुझुकीच्या नवीन अल्टो मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे
एक्स-शोरूम मूल्य हे स्टँडर्ड आवृत्ती 2.94 लाख; स्टँडर्ड (ओ) 2.97 लाख; एलएक्सआय
3.50 लाख; एलएक्सआय (ओ) 3.55 लाख आणि व्हीएक्सआय 3.72 लाख रूपये इतके आहे.
No comments:
Post a Comment