30 April 2019

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?



उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?


सध्या राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. या वाढत्‍या उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. त्‍यामुळे उष्माघाताची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? ते पाहुयात...


1) डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. शक्यतो फ्रिजमधले थंडगार पाणी पिणे टाळावे.


2) नियमित सब्जा घातलेले पाणी प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळत राहील.


3) उन्हातून एसीत किंवा एसीतून लगेच उन्हात जाऊ नका. कारण शरीराला झटकन बदललेल्या तापमानाशी जुळवून घेणे कठीण जाते.


4) गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात. त्यामुळे शक्यतो फिकट रंगाचे कपडे, सूती कपडे वापरावेत.


5) उन्हात फिरताना पांढरा स्कार्फ किंवा डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडा.


6) दही, ताकाचा आहारात समावेश करा. तेलकट तूपकट वर्ज्य करुन हलका आहार घेत रहा.


7) लिंबूपाणी, कोकम सरबत किंवा कैरीचे पन्हे पिण्यावर भर द्यावा.


8) कलिंगड, ताडगोळा, खरबूज, जाम अशी फळे भरपूर खावीत. यामुळे, आरोग्याला फळांतील नैसर्गिक जीवनसत्त्वे थेट मिळतील.


दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळता येणार नसेल, तर किमान वरील गोष्टी दुर्लक्षित करू नका. कारण उष्माघात शरीराला आतून कमकुवत बनवतो हे लक्षात ठेवा.

No comments:

Post a Comment