18 May 2019

इस्रोची नवीन मोहीम मिशन शुक्र

इस्रोची नवीन मोहीम; मिशन 'शुक्र'


आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा घेतला निर्णय, या यानाद्वारे शुक्राशी संबंधित माहिती घेतली जाणार

*मोहीमेत काय अभ्यास केला जाणार?*

▪ पुढील 10 वर्षात 7 अंतराळ मोहीमा काढण्याचा इस्रोचा मानस असून त्यातली एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.

▪ 2023 मध्ये 'शुक्र' मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे. इस्रोच्या मंगळयान मोहीमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

▪ शुक्र ग्रहावर कसं वातावरण आहे? शुक्र आणि पृथ्वी यांच्यात साम्यस्थळं आहेत ती नेमकी काय आहेत? विविध थर, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्याबाबत अभ्यास केला जाणार आहे.

▪ जगभरातल्या सुमारे 20 देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आता शुक्राबाबतची मोहीम कशी असेल? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



No comments:

Post a Comment