18 May 2019

अमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांत बदल; भारतीयांना होणार फायदा*

*अमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांत बदल; भारतीयांना होणार फायदा*

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे इमिग्रेशन धोरण केले जाहीर

*आता बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत* : अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी आता बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत लागू होणार आहे.

*डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

▪ तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे.
▪ आता केवळ लॉटरीपदधतीने नव्हे किंवा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून नव्हे तर तुमच्यातील उच्च दर्जाचे कौशल्य आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारावरच आता व्हिसा जारी केले जातील.
▪ आम्हाला आमचा देशही घडवायचा आहे. येथील नागरीकांच्या हिताचीही काळजी घ्यायची आहे. त्याचाही विचार करून हे नवीन व्हिसा धोरण अंमलात येत आहे.

*भारतीयांना होणार फायदा* : नव्या धोरणानुसार अतिकुशल कर्मचाऱ्यांचा कोटा 12 टक्‍क्‍यांवरून 57 टक्के करण्यात येणार आहे. या धोरणाचा हजारोंच्या संख्येतील भारतीयांना लाभ होणार आहे.

No comments:

Post a Comment