2 June 2019

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्याल ???


उन्हाळ्यात चेहऱ्याच्या समस्या सोडवण्याचे उपाय 





उन्हाळ्यात चेहऱ्याच्या समस्या सोडवण्याचे उपाय 

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी काही उपाया बाबत माहिती करून घेऊयात यात...

▪ दुधाची साय: कोमल, तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्यावर दुधाची साय लावणं फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील डाग दूर होण्या साठी सुद्धा साय महत्वाची आहे. साय तेलकट असल्यामुळे चेहरा मुलायम बनतो, तसेच चेहऱ्याचा रंगही उजळतो. 
कृती:- दूधाची साय घ्या व त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून एकत्र करून कॉटन बॉल्सच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

▪ बेसन: चंदन, हळद, बेसन, इत्यादी पदार्थ एकत्र करून एक मिश्रण तयार करा व चेहऱ्यावर त्याचा लेप लावा. आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा करा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज ही चेहऱ्यावर हे मिश्रण लावू शकता. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

▪गुलाब पाणी: दोन ते तीन कॉटन बॉल्स गुलाब पाण्यामध्ये भिजवून फ्रीजमध्ये ठेवा. काही वेळानंतर त्या कॉटन बॉल्सनी तुमच्या चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिट मसाज करा. मसाज करण्याआधी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा. गुलाब पाण्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.


▪ स्क्रबिंग : आपल्या स्किन टाइपनुसार, स्क्रबची निवड करा. स्क्रब करताना हातांना चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. ही स्क्रब करण्याची योग्य पद्धत आहे. स्क्रब केल्यानंतर स्किन टाइपनुसार, फेस पॅक लावा आणि दहा मिनिट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. सकाळ उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल.


▪ मुलतानी माती : जर तुमची स्किन ऑयली असेल तर चेहऱ्यावर मुलतानी माती लावा व दहा ते पंधरा  मिनिटनंतर चेहरा धुवून टाका. मुलतानी माती लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि फ्रेश लूक मिळण्यासही मदत होते.

No comments:

Post a Comment